भारताची गाठ अफगाणिस्तानशी

May 1, 2010 11:37 AM0 commentsViews: 4

1 मे

भारतीय टीमचे मिशन वर्ल्ड कप सुरु होणार आहे ते अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचने.

नवख्या अफगाणिस्तान टीमसाठी भारताचे आव्हान सोपे नक्कीच असणार नाही. पण त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे ती अव्वल टीमसोबत खेळण्याची. त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपमध्ये आपल्या पहिल्या मॅचसाठी या दोन्ही टीम सज्ज झाल्या आहेत.

नवखी अफगाणिस्तान वर्ल्ड कपच्या प्रबळ दावेदारांना सामोरी कशी जाणार हा प्रश्नच आहे. रथी महारथी असलेली टीम इंडिया ही टी-20 चे पहिले चॅम्पियन आहेत. धोणी ब्रिगेडला या नवख्या टीमबद्दल काहीही माहीती नाही. पण टीम इंडिया या पहिल्या आव्हानाला सज्ज झाली आहे.

एका दणदणीत विजयानंतर परतल्यावर मायदेशात टीमला हा तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे या वर्ल्ड कपमध्ये छाप उमटवत आपल्या देशवासीयांना एक अनोखी भेट द्यायला आता हे नवीन स्टार्स सज्ज झाले आहेत.

close