नोटाबंदीचा ‘या’ मराठी माणसाने 2 वर्षांपूर्वी दिला होता सल्ला

November 10, 2016 5:08 PM0 commentsViews:

ANIL BOKIL

10 नोव्हेंबर:मोदींनी केलेल्या आर्थिक सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय सामान्य जनतेकडून त्यांचे कौतुक होत आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी त्यांनी उचललेले हे पाऊल खूप मोठा क्रांतिकारी बदल घडवून आणेल अशी अपेक्षा आहे. मात्र या ऐतिहासिक आणि धाडसी योजनेच्या मागे एक अनिल बोकिल नावाचा मराठी माणूस आहे. हे आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे. ते व्यवसायाने इंजिनियर असून महाराष्ट्रातील अर्थक्रांती प्रतिष्ठानचे महत्त्वाचे सदस्य आहेत.

तर झाले असे की, 2014च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी बोकिल मोदींना एकदा भेटले होते. तेव्हा त्यांना फक्त 9 मिनिटांची परवानगी देण्यात आली होती. मात्र एकूण विषय ऐकता मोदींनी त्यांना चक्क 2 तासासाठी थांबविलं. त्यांचा प्लॅन मोदींना चांगला वाटला,स्वागतार्ह वाटला. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल बोकिल यांनी हा प्रस्ताव घेऊन राहुल गांधींकडेही गेले होते आणि त्यांनी बोकिल ह्यांना फक्त 15 सेकंदांचा वेळच दिला. त्यांना ह्यात काही तथ्य वाटलं नाही. मात्र, मोदींनी त्यांच्या प्रस्तावाचा स्विकार करुन त्यावर काम सुरू केले. अशाप्रकारे कमालीची अंतर्गत गुप्तता पाळुन पार पाडलेली ही योजना इतकी मोठी आणि स्वागतार्ह ठरली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close