असंही पैसा बचाव ?, चक्क 1 लाख 88 हजारांचे रेल्वे तिकीट बुक

November 10, 2016 5:41 PM0 commentsViews:

rail_ticket210 नोव्हेंबर : अचानक 500, 1000 च्या नोटा चलनातून रद्द करून मोदींनी सर्वानाच जोरका झटका दिला आहे. पण आता ह्या नोटा कश्या बदलून मिळतील यासाठी लोक सुद्धा नवं नवीन क्लुप्त्या शोधून काढत आहे. बुलडाण्यात एका व्यक्तीने देशाच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत रेल्वेची 1 लाख 88 हजारांचे तिकीट बुक केले.

बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील एका व्यक्ती ने नोटा बदलण्यासाठी चक्क 1 लाख 88 हजाराचे रेल्वेतिकीट बुकिंग केले आहे. ह्या व्यक्तीने दिल्ली ते त्रिवेंद्रम पर्यंत हे तिकीट बुक केले असल्याचं समोर आलंय. घरातील 12 लोकांच्या नावाने ही बुकिंग केली आहे. त्यामुळे आता ही रेल्वे तिकीटावर ही व्यक्ती खरोखर प्रवास करणार आहे की तिकीट कॅन्सल करून आपल्या 500, 1000 च्या नोटा बदलून घेण्यासाठी ही सारी उठाठेव होती हे तर काही दिवसात कळेलच.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close