बादशहाचा प्रवास पुस्तकरुपात

November 10, 2016 6:04 PM0 commentsViews:

10 नोव्हेंबर : ’25 वर्ष बॉलिवूडमध्ये काम करूनही आजही इथे मी एक न्यूकमर असल्यासारखंच वाटतंय,’ हे उद्गार आहेत किंग खान शाहरूखचे. शाहरूख खानच्या ’25 इयर्स ऑफ लाईफ’ या शाहरूखवरच्या पुस्तकाचं नुकतंच मुंबईत प्रकाशन करण्यात आलं. लेखक दिग्दर्शक समर खान यानं हे पुस्तक लिहिलंय. ख्यातनाम जाहिरात दिग्दर्शक पियुश पांडे यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं.

या सोहळ्याला ‘बाजीगर’चे दिग्दर्शक अब्बास मस्तान आणि ‘कभी हां कभी ना’चे दिग्दर्शक कुंदन शहा हजर होते. यावेळी किंग खानने आपल्या बॉलिवूडमधल्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close