नोटबंदीमुळे कांद्याचा वांदा, शेतकऱ्यांचा माल उधारीवर !

November 10, 2016 7:37 PM0 commentsViews:

kanda_34210 नोव्हेंबर : नोटबंदीचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसू लागलाय. नोटबंदीमुळे कांद्याचे भाव कोसळलेत. तर शेतकऱ्यांना उधारीवर माल विकावा लागतोय. नवी मुंबईतही शेतमालाला उठाव नाही.

नोटाबंदीचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसू लागलाय. पाचशे आणि हजारांच्या नोटांवरील बंदीमुळं बाजारात शंभर आणि इतर नोटांचा तुटवडा निर्माण झालाय. त्यामुळे धुळ्यातल्या शेतकऱ्यांवर कांदा उधारीवर विकण्याची वेळ आलीये. याहून गंभीर बाब म्हणजे याचा कांद्याच्या भावावरही परिणाम झालाय. कांद्याचे भावही कोसळू लागलेत. कांदा खराब होईल या भीतीनं शेतकरी पडलेल्या भावात कांदा विकू लागलेत. नवी मुंबई बाजार समितीतही वेगळी स्थिती नाही. बाजारात पाचशे आणि हजारांच्या नोटांचा महापूर आलाय. तर इतर चलनी नोटांची टंचाई निर्माण झालीये. त्यामुळे व्यापाऱ्यांची मोठी अडचण झालीये.

व्यापाऱ्यांकडे पैसा नसल्यानं त्यांचीही अडचण झालीये. त्यामुळं बाजारात आलेला भाजीपाला तसाच पडून आहे. नोटाबंदीने काळयापैशावाले अडचणीत येतील असा लोकांचा अंदाज होता. पण सध्या तरी याचा सर्वात मोठा फटका सामान्य शेतकऱ्यांनाच बसल्याचं दिसून आलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close