राज्यातल्या जिल्हा बँकांमध्ये नोटबंदी

November 10, 2016 7:56 PM0 commentsViews:

MSC Bank110 नोव्हेंबर : रिझर्व बँकेचे आदेश नसल्याने राज्य सहकारी बँक आणि जिल्हा सहकारी बँकांमध्ये पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारल्या जात नाही. रिझर्व बँकेने नोटा स्वीकारल्या जातील अशा ज्या बँकांची यादी दिलीये. त्या यादीत राज्य सहकारी बँकेचं नाव नाही. त्यामुळं जिल्हा बँकांच्या खातेदारांची प्रचंड अडचण होतेय.

चार हजारांपेक्षा जास्त असलेल्या हजार आणि पाचशेच्या नोटा खात्यात भरायच्या तर कोणत्या खात्यात भरायच्या असा प्रश्न जिल्हा बँकांच्या खातेदारांना पडलाय.

राज्य सहकारी बँकेनं रिझर्व बँकेकडे ग्राहकांकडून हजार पाचशेच्या नोटा स्वीकारण्याची परवानगी मागितलीये. पण रिझर्व बँकेनं अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close