दिल्ली-मुंबईत आयकर विभागाचे ज्वेलर्सवर छापे

November 10, 2016 8:24 PM0 commentsViews:

it_rade

10 नोव्हेंबर : काळा पैशावाल्यांचं कंबरडं मोडण्यासाठी 500 आणि 1000 च्या नोटा रद्द करण्यात आल्यात. आता आयकर विभागानेही काळ्या पैशांविरोधात धडक कारवाई सुरू केलीये. दिल्लीसह मुंबईतील ज्वेलर्सवर छापे टाकले आहे.

500 आणि 1000 च्या नोटा वापरातून रद्द झाल्यानंतर काळा पैसा व्हाईट कसा करायचा यासाठी लोकांकडून खटाटोप सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर काळा पैशाची सोन्यात गुंतवणूक होत असल्याचा संशय आयकर विभागाला आहे. त्यामुळे दिल्ली आणि मुंबईतील ज्वेलर्सवर छापे टाकण्यात आले आहे. जुन्या नोटा घेणा•या ज्वेलर्सवर छापे टाकण्यात आले आहे.
दिल्लीतील करोल बाग, चांदणी चौकात ही कारवाई करण्यात आलीये. तसंच हिरे व्यापा•यांवर आयटी विभागाची करडी नजर असणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close