मुंबई सेशन्स कोर्टाकडून विजय मल्ल्या फरार घोषित

November 10, 2016 11:35 PM0 commentsViews:

vijay10 नोव्हेंबर : बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवणा-या मद्यसम्राट विजय मल्ल्याला मुंबईतल्या सेशन्स कोर्टाने फरार घोषित केलंय. कर्ज बुडवून सध्या मल्ल्या इंग्लंडमध्ये लपून बसलाय.

मल्ल्याच्या मालमत्तेवर जप्ती आणावी असे आदेशही कोर्टाने दिले आहेत. जप्त करण्यात येणा-या मालमत्तेत स्थावर मालमत्ता आणि शेअर्सचाही समावेश असणार आहे. ईडी लवकरच जप्तीच्या कारवाईला सुरुवात करणार आहे.

विशेष म्हणजे, मल्ल्यांना हद्दपार करून भारतात पाठविण्यात यावे, अशी विनंती भारत सरकारने ब्रिटनला केली होती. मात्र, ब्रिटनने नकार दिलाय. मल्ल्याचा भारतीय पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. तसंच त्याच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंटही जारी करण्यात आला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close