डॉनल्ड ट्रम्प यांनी घेतली ओबामांची भेट

November 11, 2016 11:31 AM0 commentsViews:

OBAMA News

11 नोव्हेंबर : अमेरिकेचे भावी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डॉनल्ड ट्रम्प यांनी काल (गुरूवारी) बराक ओबामांची भेट घेतली. व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिस या ऐतिहासिक वास्तूत ही भेट झाली.

डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्षपदी निवडून आले असले तरी सामान्य जनता, माध्यमं आणि विश्लेषकांना त्यावर विश्वासच बसत नसल्याचं सध्या चित्र निर्माण झालं आहे.  पण असं असलं तरी डोनाल्ड ट्रम्प हे विजयी झाले आहे. दोन महिन्यानंतर ते राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतील हे निश्चित.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काल डोनाल्ड ट्रम्प यांना भेटीसाठी निमंत्रण दिलं होतं. अनेक मुद्द्यांवर त्यांच्यात तब्बल 90 मिनिटे चर्चा चालली.  तसंच, अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांबाबतही ओबामांनी ट्रम्प यांना माहिती दिली.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प आणि आपल्यात काही गंभीर मतभेद असल्याचे वक्तव्य बराक ओबामांनी केले होते. असं असलं तरी आपण डोनाल्ड ट्रम्प यांना सत्तांतरासाठी पूर्णपणे सहकार्य करू असंही ओबामा म्हणालेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close