भारतही पहिले अण्वस्त्राचा वापर करू शकतो – संरक्षणमंत्री

November 11, 2016 12:44 PM0 commentsViews:

Manoihar parisdajpg

11 नोव्हेंबर : भारत पहिले अण्वस्त्राचा वापर करणार नाही असा एक समज आहे. पण मला या विचारात अडकून बसायचे नाही. वेळ पडली तर भारतही पहिले अण्वस्त्रांचा वापर करु शकतो असं मत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी मांडले आहे. पण हे माझं मत आहे, सरकारचं नव्हे, असं त्यांनी स्पष्ट केलं.  मनोहर पर्रिकर यांनी केलेल्या या विधानानंतर देशात खळबळ उडाली असून या विधानाचा नेमका अर्थ काय घ्यायचा याबद्दल उलट सुलट चर्चा सुरू झाली.

दिल्लीत निवृत्त ब्रिगेडियर गुरमीत कानवाल यांच्या ‘द न्यू अर्थशास्त्र’ या पुस्तकाचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्याहस्ते प्रकाशन झालं. या सोहळ्यात पर्रिकरांना अण्वस्त्र धोरणावर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर पर्रिकरांनी आपलं बेधडक मत मांडलं.

पर्रिकर म्हणाले, जर तुम्ही आधीपासूनच्या अण्वस्त्र धोरणाचे पालन कराल किंवा पूर्वीच्याच भूमिकेवर ठाम असाल तर तुम्ही अण्वस्त्र शक्ती कमी करत आहात असे मला वाटते. लोक म्हणतात की भारत पहिले अण्वस्त्राचा वापर नको या विचारधारेवर चालतो. पण मी स्वतःला या बंधनात अडकवून ठेवत नाही असे पर्रिकर यांनी सांगितले. भारत एक जबाबदार देश असून आम्ही अण्वस्त्रांचा बेजबाबदारपणे वापर करणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close