‘नोटबंद’च्या निर्णयाचा फटका, 3 लाख लोकांनी मोदींना केलं ‘अनफॉलो’!

November 11, 2016 2:58 PM0 commentsViews:

article-img_2-1

11 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा धाडसी निर्णयावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केलंय पण यानिर्णयामुळे लोकांची चांगलीच गैरसोय झाली आहे. त्यामुळेच की काय पंतप्रधान मोदी यांना ट्विटरवर फोलो करणाऱ्या ३ लाख लोकांनी एकाच दिवसात ‘अनफॉलो’ करुन आपली नाराजी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला. पंतप्रधानांच्या या निर्णयाचे देशातील सर्व स्तरावरून स्वागत जरी होत असलं तरी सोशल मीडियावर त्याचं तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. मोदींच्या घोषणेनंतरच्या दुसऱ्याचं दिवशी म्हणजेच 9 नोव्हेंबरला 3.13 ट्विटरकरांनी पंतप्रधान मोदींना अनफॉलो केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेले भारतीय आहेत. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा मोदी यांच्या फॉलोअर्सची संख्या जास्त आहे. त्यांना दिवसाला हजारो- लाखो फॉलोअर्स ट्विटरवर फोलो करत असतात. मात्र नोटा बंद करण्याचा निर्णय बंद केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लाखोंच्या संख्येने लोकांनी मोदींना अनफाॅलो केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close