आता करदात्या पालिकेच्या दारात, लातूर पालिकेत एकाच दिवसाच दीड कोटी कर वसूल !

November 11, 2016 6:06 PM0 commentsViews:

latur11 नोव्हेंबर : पाचशे आणि हजारांच्या नोटा चलनातून बाद केल्याचा सर्वाधिक फायदा लातूर महानगरपालिकेला झालाय. एकाच दिवसात लातूर महापालिकेत दीड कोटींचा कर वसूल झालाय आणि यासाठी महापालिकेनं कर्मचाऱ्यांना कोणाच्याही दारावर जावं लागलं नाही हे विशेष.

कालच मनपा स्थायी समिती सभापतींनी नागरिकांनी सर्व प्रकारचे टँक्स भरण्यासाठी पाचशे आणि हजारांच्या नोटा टॅक्स साठी चालतील असं आवाहन केल्यानंतर महानगर पालिकेत पहिल्यांदाच टॅक्स भरणा करण्यासाठी अभूतपूर्व गर्दी लोकांनी केलीय. एरवी मनपाला लोकांच्या दारापर्यंत जाऊन कर वसुली करावी लागायची , ब-याचदा सक्तीचं पाऊल देखील मनपाला उचलावं लागायचं मात्र अचानक पाचशे आणि हजारांच्या नोटांवर बंदी आल्यानं नेहमीच वसुलीसाठी त्रस्त असणा-या लातूर मनपाच्या तिजोरीत एकाच दिवसात दrड कोटींचा कर जमा झालाय. त्यामुळं पैशांचा अभावामुळे नेहमीच त्रस्त असलेल्या मनपाला नोटा बंदीचा फायदा मिळालाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close