गोव्यातील दिगंबर कामत सरकार हटवण्याचे प्रयत्न निष्फळ.

October 18, 2008 1:42 PM0 commentsViews: 5

दिनांक 18 ऑक्टोबर, गोवा – गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना पदावरून हटवण्याचे सगळे प्रयत्न हाणून पाडण्याचं काँग्रेसनं ठरवलं आहे. भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस बी. के. हरिप्रसाद यांनी काल रात्री मंत्रिमंडळातील असंतुष्टांशी चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री दिगंबर कामत, रवींद्र नाईक आणि बाबुश मॉन्सेरॉत यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केल्यानंतर त्यांनी मॉन्सेरॉत यांच्या अटी स्वीकारण्यास नकार दिला आहे. याबाबत मॉन्सेरॉत यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. तर रोहित मॉन्सेरॉत प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे करण्याचं आश्वासन काँग्रेसनं दिलं आहे.

close