राष्ट्रीय महामार्गांवर आता 11 नव्हे तर 14 नोव्हेंबरपर्यंत टोलमाफी

November 11, 2016 7:14 PM0 commentsViews:

Toll-Naka-31352_ol11 नोव्हेंबर : 500 आणि 1000 च्या नोटा वापारातून रद्द झाल्यामुळे सर्वच ठिकाणी नोटाबंदी लागू झालीये. त्यामुळे टोल नाक्यांवर सुट्टे पैशांअभावी टोल नाक्यांवर गोंधळ उडालाय. त्यामुळे 11 नोव्हेंबरची टोलमाफी आता 14 नोव्हेंबपर्यंत वाढवण्यात आलीये.

टोलनाक्यांवर सुट्टे पैशांच्या टंचाईमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोलनाके बंद राहणार अशी महत्त्वाची घोषणा दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. आता 11 नोव्हेंबरची मर्यादा वाढवण्यात आली असून 14 नोव्हेंबरपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावर टोलमाफी असणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close