‘…गंगेला मिळालं’, गंगेत आढळल्या फाटलेल्या 1000 च्या नोटा

November 11, 2016 8:37 PM0 commentsViews:

ganga311 नोव्हेंबर - ‘झालं गेलं गंगेला मिळालं’ म्हणे प्रमाणेच काळा पैशावाल्यांनी आपल्याकडील जास्तीच्या संपत्तीला गंगेला अर्पण केल्याची घटना मिर्झापूरमध्ये घडलीये.

500 आणि 1000 च्या नोटा वापरातून रद्द झाल्यानंतर काळा पैशावाल्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. पैश्याची विल्हेवाट लावण्यासाठी जाळणे,कच-यात फेकुन देणे अशा घटना समोर येत आहेत. आता तर पवित्र गंगा नदीत 1000 रुपयाच्या फाटलेल्या नोटा सापडल्याचे समोर आलंय. स्थानिकांनी ते पैसे गोळा करुन पोलिसांकडे जमा केले आहेत. पोलिसांकडुून याचा तपास सुरू आहे.यापुर्वीसुद्धा अश्या 500-1000 च्या नोटा नष्ट करण्यासाठी जाळण्यात आल्या होत्या. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून तो चर्चेचा विषय ठरला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close