बँकेत झुंबड, एटीएममध्ये खडखडाट !

November 12, 2016 12:49 PM0 commentsViews:

bank_gardi

12 नोव्हेंबर : देशभरातही आजही बहुतांश बँका आणि एटीएमबाहेर लोकांच्या रांगा कायम आहे. देशातील अनेक एटीएममध्ये अजूनही खडखडाट असल्यामुळे लोकं चांगलीच वैतागली आहे. राजधानी दिल्लीतसुद्धा चांदनीचौकमध्ये सिंडीकेट आणि विजया बँकेबाहेर लोकांची चेंगराचेंगरी झाली.

500 आणि 1000 च्या नोटा 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून वापरातून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे आपल्याकडे असलेले पैसे बदलून घेण्यासाठी लोकांची बँकेत एकच झुंबड उडालीये.
आज सलग चौथ्या दिवशीही लोकांची अलोट गर्दी पाहण्यास मिळत आहे. पहाटे आणि मध्यरात्रीही एटीएमबाहेर रांगा बघायला मिळतायेत. अनेक एटीएममध्ये कॅश नसल्यामुळे सर्वसामान्याचे हाल होत आहे. आज शनिवारी आणि उद्या रविवारी बँक सुरू असणार आहे. आज दुस•या शनिवारची सुट्टी असल्यामुळे चाकरमान्यांनी बँकेतून पैसे बदलून घेण्यासाठी गर्दी केलीये.

एटीएममध्ये 2 हजाराची नोटला जागाच नाही

विशेष म्हणजे, सध्याचे जे एटीएम आहेत, त्यांच्यामध्ये 2 हजाराच्या नोटेसाठी वेगळा स्लॉट नाहीय. त्यामुळे नवीन नोट मशीनमध्ये ठेवायची कशी, ही मोठी अडचण आहे. आता एटीएम बनवणा•या कंपन्यांना मध्ये घेऊन त्यांच्याकडून हे काम करून घ्यावं लागणार आहे.

देशभरातील 2 लाख एटीएम मशीन अजूनही बंद

मशीन मध्ये 2000 ची नोट मावत नाही

मशीन्समध्ये 100,500,1000 ची नोट ठेवण्याची सोय

मशीनमध्ये करावा लागणार बदल

मशीन कंपन्यांची लागणार मदत

2000च्या नोटेसाठी नवा कप्पा तयार करावा लागणार

आणखी 4 ते 5 दिवस लागणार


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close