धक्कादायक, तीन मुलींना विष देऊन बापाची आत्महत्या

November 12, 2016 1:08 PM0 commentsViews:

susideमुंबई,12 नोव्हेंबर : एका जन्मदात्याने आपल्या 3 मुलींना विष देऊन स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. अंधेरीच्या साकीनाका परिसरातली ही घटना आहे.
मंगेश आणेराव असं या आत्महत्या करणा-या पित्याचं नाव आहे. प्रॉपर्टीच्या वादातून या बापानं हे कृत्य केल्याचं समजतंय. साकीनाका भागातील मोहिली व्हिलेज भागात सकाळी ही घटना घडली. 1 वर्षाच्या जुळ्या मुली आणि एक 4 वर्षांच्या मुलीला विष देऊन मारण्यात आलं. या प्रकरणी पोलीस पुढचा तपास करत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close