मोदींनी केला जपानच्या सुपरफास्ट बुलेट ट्रेनने प्रवास

November 12, 2016 1:20 PM0 commentsViews:

12 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान दौ-यावर आहे. आज त्यांनी जपानमधल्या बलाढ्य कावासाकी कंपनीला भेट दिली आणि जपानच्या सुपरफास्ट बुलेट ट्रेनने प्रवासही केला.

कोबे भागात कावासाकी कंपनी आहे. जपानमधली शिंकानसेन बुलेट ट्रेन कावासाकी बनवते. ही ट्रेन कशी बनते, त्यात कोणतं तंत्रज्ञान वापरण्यात येतं, हे मोदींना स्वतः पाहायचं होतं. याच बुलेट ट्रेनमधून मोदींनी आज सकाळी प्रवास केला. जपानचे पंतप्रधान शिंजो आबेही त्यांच्याबरोबर होते. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत मोदींच्या भेटीत करार होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचा 90 टक्के खर्च जपान उचलेल, अशी अपेक्षा आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close