वर्षभरात आटोपला खटला

May 3, 2010 8:41 AM0 commentsViews: 6

3 एप्रिल

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या खटल्याला 14 एप्रिल 2009 ला सुरूवात झाली. आणि वर्षभराच्या आत 31 मार्च 2010 ला खटल्याचा अंतिम युक्तीवादही संपला. एवढ्या मोठ्या हल्ल्याचा खटला वर्षभराच्या आत संपला, हे विशेष आहे.

या खटल्याच्या घटनाक्रमावर एक नजर टाकूयात…

26 नोव्हेंबर – मुंबईवर अतिरेकी हल्ला

27 नोव्हेंबर – पहाटे दीड वाजता, गिरगाव चौपाटीजवळ कसाबला जिवंत पकडण्यात पोलिसांना यश

29 नोव्हेंबर – पोलिसांनी नोंदवला कसाबचा जबाब, अतिरेकी हल्ल्यात सहभागाची कबुली

29 नोव्हेंबर – 9 अतिरेक्यांचा खातमा, ऑपरेशन टोरनॅडो संपलं

27/28 डिसेंबर – ओळख परेड

13 जानेवारी 2009 – सरकारतर्फे 26/11 खटल्यासाठी एम. एल. ताहिलयानी यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती

16 जानेवारी – 26/11 खटला चालवण्यासाठी आर्थर रोड जेलची निवड

5 फेब्रुवारी – कुबेर बोटीतून मिळालेल्या सामानाशी कसाबचे डीएनए जुळत असल्याचा अहवाल फॉरेन्सिक सायन्स लॅबने दिला

20/21 फेब्रुवारी – मॅजिस्ट्रेट आर. व्ही. सावंत- वाहुले यांच्यापुढे कसाबने दिली गुन्ह्यांची कबुली

22 फेब्रुवारी – 26/11 खटल्यासाठी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

25 फेब्रुवारी – कसाब आणि इतर दोन आरोपींविरुध्द एस्प्लनेड मेट्रोपोलिटन कोर्टात चार्जशीट दाखल

1 एप्रिल – कसाबच्या वकील म्हणून अंजली वाघमारे यांची नियुक्ती

16 एप्रिल – अंजली वाघमारे यांच्या जागी अब्बास काझमी यांची नियुक्ती

17 एप्रिल – कसाब याचा कबुलीजबाब कोर्टात उघडण्यात आला

20 एप्रिल – सरकारी वकिलांनी ठेवले कसाबवर 312 आरोप

29 एप्रिल – कसाब हा अल्पवयीन नसल्याचा कोर्टाचा निष्कर्ष

6 मे – कसाबवर 86 आरोप निश्चित करण्यात आले, पण कसाबने केला आरोपांचा इन्कार

8 मे – पहिला प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची साक्ष नोंदवण्यात आली. साक्षीदाराने कसाबला ओळखलं

23 जून – 22 फरार आरोपींविरोधात कोर्टाचे अजामीनपात्र वॉरंट. हफीज नक्वी, झकी उर रेहमानचा समावेश

20 जुलै – कसाबने न्यायमूर्ती ताहिलयानी यांच्यासमोर केला गुन्हा कबूल

30 नोव्हेंबर – कसाबचे वकील अबबास काझमी यांची कोर्टाने केली गच्छंती

1 डिसेंबर – काझमींचे सहकारी के.पी.पवार यांची कसाबचे वकील म्हणून नियुक्ती

16 डिसेंबर – सरकारी वकिलांनी साक्षी पुराव्यांचं काम संपवलं

18 डिसेंबर – कसाबने आरोप नाकारले

11 फेब्रुवारी 2010 – खटल्यातील एक आरोपी फईम अन्सारीचे वकील शाहीद आझमी यांची हत्या

22 फेब्रुवारी – डेव्हिड हेडलीचा मुद्दा कोर्टात उपस्थित

23 फेब्रुवारी – अंतिम युक्तिवादाला सुरुवात

31 मार्च – दोन्ही बाजंूचा अंतिम युक्तिवाद संपला

close