सुषमा स्वराज यांचा मोठेपणा, सातासमुद्रापार एका आईला पुरवली मदत

November 12, 2016 1:55 PM0 commentsViews:

sushma75912 नोव्हेंबर : भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी एका पाकिस्तानी मुलगी आणि राजस्थानी मुलाच्या लग्नाला मदत केल्याची बातमी आली होती. त्याबद्दल त्यांचं कौतुकही करण्यात आलं. आताही त्यांनी असंच ‘आऊट ऑफ द बॉक्स’जाऊन अमेरिकेत राहणा-या एका आई आणि मुलाची मदत केली.

अमेरिकेत राहणा-या दिपीका पांडे हिच्या हार्टअटॅकने मृत्यू झाला. त्यानंतर थोड्याच दिवसात तिने एका मुलीला जन्म दिला. दिपीकाला अजून एक 4 वर्षांचा मुलगा आहे जो बोस्टन येथे राहतो. तिच्या पतीच्या मृत्युनंतर तिला काही मित्रांनी न्यू जर्सी येथे चांगल्या उपचारांसाठी नेले.

तिच्याकडे भारतातील विमा पॉलिसी आहे. मात्र,अमेरिकेत दुस-या देशातील आरोग्य विमा पॉलिसी वैध मानली जात नाही. गरोदर असल्याने ती भारतात परतही येऊ शकत नव्हती.अश्या संकंटात दिपीका सापडली होती. तेव्हा तिच्या कुटुंबियांनी पंतप्रधानांना पत्र लिहीलं आणि तिच्या मुलीसाठी लवकरात लवकर परदेशस्थित भारतीयाचा परवाना द्यावा ,अशी विनंती केली.

त्या पत्राला सोशल मीडियावर प्रचंड पाठिंबा मिळाला आणि ते सुषमा स्वराज यांच्यापर्यंतही पोहोचलं. त्यावर त्यांनी भारतीय दुतावासाला दिपीकाची कोणत्याही परिस्थितीत मदत करण्यास सांगितलं.सुषमा स्वराज यांच्या सांगण्यानंतर भारतीय दुतावासाने तातडीने दिपीकाला मदत पुरवली. दिपीकाला आणि तिच्या मुलीला लवकरात लवकर भारतात सुखरुपपणे घेऊन येण्याची व्यवस्था केली. तिच्या नवजात मुलीचे OCI कार्ड (Overseas Citizenship of India ) बनवण्यात आलंय. भारतात त्यांच्या विम्याचे पैसे सोईस्कररित्या मिळवूनही देण्यात आले. अशाप्रकारे त्या दोघींवर चांगले उपचार सुरू करण्यात आले.

अनेक लोकांनी तिला लवकर मदत मिळावी म्हणून तिचे पत्र ट्विटरवर रिट्विट केले आणि तिला मदत मिळेपर्यंत पाठपुरावा केला.तिला आणि तिच्या मुलीला लवकरात लवकर बरे वाटावे आणि त्यांनी नवीन आयुष्याला सुरुवात व्हावी ,ही प्रार्थना.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close