आजचा त्रास भविष्यात फायदेशीर, आमिर खानकडून मोदींच्या निर्णयाचं स्वागत

November 12, 2016 3:53 PM0 commentsViews:

amir_khan44212 नोव्हेंबर : 500 आणि 1000 च्या नोटबंदीचं अभिनेता आमिर खानने स्वागत केलंय. आपल्या आता होणार त्रास याचा विचार करू नये उलट भविष्यात होणा•या फायदा लक्षात घ्यावा असं सांगत आमिर खानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिलाय.

असहिष्णुतेच्या मुद्यावरुन आमिर खानला भाजप कार्यकर्त्यांचा रोष ओढावून घ्यावा लागला होता. पण, आता मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानने मोदींच्या निर्णयाचा स्वागत केलं. 500 आणि 1000 च्या नोटा बंद केल्यात हा निर्णय योग्यच आहे. आता आपल्याला थोडाफार त्रास होईल. खर्चाला पैसे नसले पण हरकत नाही. आता होणा•-या या त्रासाचा भविष्यात खूप मोठा फायदा होईल असं मत आमिर खानने व्यक्त केलं. एवढंच नाहीतर उद्या माझ्या चित्रपटावर याचा परिणाम झाला तरी काही हरकत नाही असंही आमिर म्हणाला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close