कसाबवर 86 आरोप, 12 गुन्हे

May 3, 2010 8:56 AM0 commentsViews: 30

3 मे

26/11 च्या खटल्यात एकूण तीन आरोपी आहेत. आरोपी नंबर एक अजमल कसाब, आरोपी नंबर दोन फईम अन्सारी आणि आरोपी नंबर तीन सबाउद्दीन अहमद. या पैकी कसाबवर एकूण 86 आरोप, 12 गुन्हे दाखल आहेत.

कसाबवरील आरोप

- कलम 120 बी सह 121 : देशाविरोधात युद्ध पुकारणे

- कलम 120 बी : कट रचणे

- कलम 120 बी, 302, 34 : 166 जणांची हत्या

- कलम 307, 34 : खुनाचा प्रयत्न

- कलम 333, 34 : सरकारी नोकरास दुखापत करणे

- कलम 333 , 120 बी : सरकारी नोकरास कट रचून दुखापत करणे

- कलम 342 आणि 343 : अन्यायाने कैदेत ठेवणे

- कलम 342 , 120 बी सह : कट रचून अन्यायाने कैदेत ठेवणे

- कलम 364 सह 120 – बी : खून करण्याकरता अपहरण

- कलम 468 – बी : एखाद्या व्यक्तिची बदनामी करणारी कागदपत्रं तयार करणं

- कलम 468, 120 : एखाद्या व्यक्तिच्या बदनामीसाठी कट रचून कागदपत्रं तयार करणं

- कलम 471 – 120 बी सह : बनावट कागदपत्रं खरे म्हणून वापरण्यासाठी कट रचणं आणि त्याचा वापर करणं

- कलम 436, 120 बी सह : स्फोटकांनी घर उडवून देणे

- कलम 341 सह 397 : दरोडा

या खटल्यात एकूण 311 आरोप ठेवण्यात आलेत. यापैकी

35 आरोपी फरार

9 आरोपींचा मृत्यू

3 आरोपी अटकेत

close