मनमाड : नोटाच्या चिंतेमुळे एकाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

November 12, 2016 10:22 PM0 commentsViews:

maegaon12 नोव्हेंबर : केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे आता गंभीर परिणाम नागरिकांवर दिसू लागले आहेत. 500 आणि 1000 च्या नोटा बदलून न मिळाल्यानं चिंतेत असलेल्या एका 52 वर्षाच्या व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मालेगावमध्ये घडली आहे.

मालेगावच्या दातार नगर भागात राहणारे इम्रान शेख हे एका यंत्र माग कारखान्यात काम करतात. शुक्रवारी यंत्र महाग कामगारांना साप्ताहिक सुट्टी असते आणि गुरुवारी रात्री त्यांना आठवड्याचा पगार दिला  जात असतो.

गुरुवारी त्यांना पगार मिळाला पण त्यात 500 आणि 1000 च्या नोटा होत्या. त्यामुळे सकाळी मिळालेल्या पगारातील नोटा बदलण्यासाठी मालेगावच्या बँक ऑफ महाराष्ट्रात गेले होते. सकाळपासून रांगेत उभे राहुनही संध्याकाळपर्यंत आपला नंबर न आल्याने ते निराश झाले.आणि घरी आल्यावर त्यांची प्रकृती खराब झाली आणि त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आल्यांनं त्यांचा मृत्यू झाला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close