बँकेतून सारखे पैसे काढू नका, रिझर्व्ह बँकेचे नागरिकांना आवाहन

November 13, 2016 2:48 PM0 commentsViews:

RBI benner

13 नोव्हेंबर : रिझर्व्ह बँकेतर्फे नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  बँकेतून वारंवार पैसे काढू नका, तसंच घरात जास्त रक्कम जमवून ठेवू नका, असं आवाहन रिझर्व्ह बँकेतर्फे करण्यात आलं आहे. बँका आणि एटीएमबाहेर सर्वसामान्य नागरिकांनी केलेली झुंबड पाहता आरबीआयने हे आवाहन केलं आहे.

आरबीआय आणि बँकांकडे पुरेशा प्रमाणात शंभर किंवा त्याहून कमी रक्कमेच्या नोटाही उपलब्ध आहेत.  त्यामुळे ग्राहकांनी चिंता करु नये. बँकांच्या वारंवार फेऱ्या मारुन पैसे काढू नयेत. गरज असेल तेव्हाच पैसे काढावेत, आवश्यक तितकी रक्कम उपलब्ध आहे, अशी माहिती आरबीआयने दिली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close