नोटबंदींचा फटका; बुधवारपासून स्कूल बसेस् बंद

November 13, 2016 5:10 PM0 commentsViews:

Schools-reopen

13 नोव्हेंबर :  16 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातल्या स्कूल बस सेवा बंद करण्याचा निर्णय राज्य स्कूल बस असोसिएशनने घेतला आहे. बसेस् चालवण्यासाठी दिवसाला 20 हजार रुपये लागतात. पैसे नसतील तर पेट्रोल-डिझेल कसे भरणार?, असा सवाला उपस्थित करत बुधवारपासून स्कूल बसेस् असोसिएशनने स्कूल बस बंद ठवण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 च्या नोटा रद्द झाल्याची घोषणा केली. अचानकपणे घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांची त्रेधातिरपीट उडाली. बँकांत गर्दी आणि एटीएम बंद असल्यामुळे लोकांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतंय. तसंच, एका व्यक्तीला एका दिवसांत फक्त 4 हजार रूपये काढण्याची मुभा आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

अशाच काही समस्यांना शाळांना देखील सामोरं जावं लागत आहे. बसेस चालवण्यासाठी दिवसाला 20 हजार रुपये लागतात. त्यात नोटबंदीमुळे एका बँकेतून एका वेळी फक्त 3-4 हजार रुपये काढता येऊ शकतात. अशात पैसे नसतील तर पेट्रोल- डिझेलचा खर्च भागवायचा कसा? असा सवाल स्कूलबस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर, येत्या बुधवारपासून सर्व सेवा सुरळीत होईपर्यंत स्कूल बस बंद ठेवण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close