आता चहावालाही बोलतोय ‘पेटीएम करो…’

November 13, 2016 6:51 PM0 commentsViews:

13 नोव्हेंबर : पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार झाल्यानंतर नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. देशातील विविध भागात बँक आणि एटीएमसमोर नागरिकांच्या लांबच लाब रांगा पाहायला मिळत आहेत. बँक आणि एटीएमसमोरील गर्दीमुळे बँक खात्यामध्ये पैसा असून देखील नागरिकांना पैशाची चणचण भासत आहे. मात्र दिल्लीतल्या एका चहावाल्यानं मोदींच्या या निर्णयाला पाठिंबा देत स्वतःच्या ग्राहकांसाठी पेटीएमची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

दिल्लीतल्या आर के पुरममध्ये मोनू नावाचा एक चहावाला आहे. मोदींनी केलेल्या घोषणेचा त्याच्या व्यवसायावरही परिणाम होत होता. त्याच्याकडे 7 रुपयाला एक चहा मिळतो. सुट्टे पैसे नसल्यामुळे ग्राहकांची निराशा होत होती. त्यामुळे त्याने आपल्या ग्राहकांसाठी पेटीएमच्या मध्यमातून पैसे स्विकारायला सुरूवात केली. त्यामुळे दिल्लीत हा चहावाला सध्या चर्चेत आहे.

Pay TM2131

आता ग्राहक 7 रुपये चहावाल्याच्या बँक अकांऊटवर ट्रान्सफर करुन चहाचा अस्वाद घेत आहेत.

देशाच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचे चहावाल्यांने स्वागत केलंय,  तर चहावाल्यांने सुरु केलेल्या ऑनलाइन पेमेंट सेवेचे याठिकाणी ग्राहकांनी स्वागत केलं आहे.

दरम्यान काळ्या पैशावर लगाम घालण्यासाठी मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर सध्या सामान्य नागरिकांना ऑनलाइन पेमंट सेवा दिलासा देणाऱ्या ठरत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close