अजमल कसाब दोषी

May 3, 2010 9:26 AM0 commentsViews: 3

3 मे

26-11 रोजी मुंबईवर हल्ला करून शेकडो बळी घेणारा एकमेव जिवंत आरोपी मोहम्मद अजमल कसाब याला स्पेशल कोर्टाने दोषी ठरवले आहे.

तर पुराव्याअभावी खटल्यातील सहआरोपी फईम अन्सारी आणि सबाउद्दीन या आरोपींना निर्दाेष मुक्त करण्यात आले आहे. त्याबद्दल कोर्टाने पोलीस तपासावर ताशेरेही ओढले आहेत.

देशाविरोधात युद्ध पुकारणे, खून करणे, कट रचणे अशा गंभीर आरोपांखाली कसाबला दोषी ठरवण्यात आले. शहीद तुकाराम ओंबळे, अशोक कामटे, हेमंत करकरे, विजय साळसकर यांच्या हत्येसाठीही कसाबला दोषी धरण्यात आले आहे.

बेकायदेशीर कारवाया करणे आणि दरोडा घालणे हे त्याच्यावरचे गुन्हेही सिद्ध झालेत.

तर जमात उद दावाचा म्होरक्या हफीज सईद आणि लष्कर-ए-तोयबाचा कमांडर झकी-उर -रेहमान लख्वी यांचा हल्ल्याच्या कटातील सहभाग सिद्ध झाला आहे.

कसाबला उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे. या शिक्षेवर उद्या युक्तीवादही होणार आहे. सकाळी 11 वाजता युक्तीवाद सुरू होईल.

14 एप्रिल 2009 ला या खटल्याची सुरूवात झाली आणि वर्षभराच्या आत 31 मार्च 2010 ला खटल्याचा अंतिम युक्तीवादही संपला.

एवढ्या मोठ्या हल्ल्याचा खटला वर्षभराच्या आत संपला, हे विशेष.

कसाबला कोर्टाने 86 प्रकरणांत दोषी ठरवले आहे. त्यापैकी ठळक आरोप पुढीलप्रमाणे –

आरोप – भारताविरुद्ध युद्ध पुकारणेनिकाल – दोषीसंभाव्य शिक्षा – फाशी

आरोप- 166 जणांची हत्या करणेनिकाल-दोषीसंभावित शिक्षा – फाशी

आरोप – स्फोटकांनी घर उडवून देणे निकाल – दोषीसंभाव्य शिक्षा – जन्मठेप

आरोप – खुनाचा प्रयत्ननिकाल – दोषीसंभाव्य शिक्षा – कैद, जन्मठेप

आरोप – खून करण्याकरता अपहरण निकाल – दोषीसंभाव्य शिक्षा – कैद, जन्मठेप

आरोप – दरोडानिकाल – दोषीसंभाव्य शिक्षा – 10 वर्ष कैद

आरोप – अन्यायाने कैदेत ठेवणे निकाल – दोषीसंभाव्य शिक्षा – 1 महिना ते 3 वर्ष कैद

आरोपबनावट कागदपत्रे खरी म्हणून वापरण्यासाठी कट रचणे आणि त्याचा वापर करणे निकाल – दोषीसंभाव्य शिक्षा – 7 वर्षांपेक्षा जास्त कैद

आरोप – सरकारी नोकरास दुखापत करणेनिकाल – दोषीसंभाव्य शिक्षा – 2 वर्ष कैद

close