सर्वसामान्यांना होत असलेल्या ‘पेन’ पेक्षा ‘गेन’ जास्त – पंतप्रधान

November 13, 2016 4:36 PM0 commentsViews:

narendra modi speech

13 नोव्हेंबर :  पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर देशातील सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास होत आहे, मात्र, या नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांना होत असलेल्या ‘पेन’ पेक्षा ‘गेन’ जास्त असेल, असं पंतप्रधान नरेंद मोदी यांनी सांगितलं.

बेळगाव इथे आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते.

ते म्हणाले, नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. एटीएममधून कमी प्रमाणात पैसे निघत असल्याने तसेच अनेक बँकांबाहेर लांबच्या लांब रांगा लागत असल्याने सर्वसामान्य नागरिक चांगलाच त्रस्त झाला असल्याची कल्पना आहे, देशवासियांनी फक्त 50 दिवस त्रास सोसावा, यातून होणाऱया त्रासापेक्षा मोठा फायदा असल्याचे ते म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close