पवारांचं बोट धरूनच राजकारण शिकलो, मोदींकडून पवारांबाबत गौरवोद्गार

November 13, 2016 8:39 PM0 commentsViews:

pawar on modi

13 नोव्हेंबर :  एकेकाळी राज्याच्या राजकारणातले सख्खे शत्रू असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते आता ऐकमेकांच्या कौतुकाचे दोहे गाऊ लागलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (रविवारी) पुण्यातल्या सभेत शरद पवार यांचं तोंडभरुन कौतुक केलं. शरद पवारांना राजकारणात 50 वर्षे पूर्ण होत आहे. त्यांनीच मला राजकारण शिकवलं, त्यांचा मला आदर आहे, मी त्यांचा आदर करणाऱ्यांपैकी एक असल्याचेही मोदी म्हणाले. पवारांनी नेहमीच खूप मदत केलीय, असंही ते सांगण्यासाठी विसरले नाहीत. त्याचबरोबर, पवारांचं राजकीय जीवन आदर्शवत असल्याचं सांगत त्यांची राजकीय कारकिर्द गौरवशाली असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. तर मोदींच्या भाषणापूर्वी पवारांनीही मोदी हे कार्यक्षम पंतप्रधान असल्याचं सांगितलं.

पुणेमध्ये आयोजित वसंतदादा शुगर केन व्हॅल्यू चेनच्या कार्यक्रमात हे दोघेही बोलत होते.

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांत बदल करण्यात आल्याने सामान्य माणसांना जो त्रास होत आहे याची कल्पना मला आहे, यातून सामान्यांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही, मी गरीबांसाठी, सामान्यांसाठी आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. तसंच, सर्वसामान्यांना त्यांच्या पैसा जसाच्या तसा बदलून मिळेल. जर पाचशे रुपये बदलून देण्यासाठी दिले तर पाचशे रुपयेच मिळतील. जर कोणी चारशे नव्व्यानव देत असले तर ते घेऊ नका. तुम्हाला तुमचा पूर्ण पैसा मिळेल. काही लोकांना यातून त्रास होत असेल तर तो त्यांना सहन करावा लागेल. मात्र, यातून देशातील करोडो नागरिकांना याचा फायदाच होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close