1000-500च्या जुन्या नोटा 24 नोव्हेंबरपर्यंत वापरता येणार

November 14, 2016 9:44 AM0 commentsViews:

Rs-500-and-Rs-1000-Main-Article-1-1

14 नोव्हेंबर :  सरकारी रुग्णालये, पेट्रोल पंप, दूधकेंद्र यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी एक हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत आणखी 10 दिवस म्हणजेच 24 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने काल घेेतला.

देशातील सरकारी रुग्णालय्, पेट्रोल पंप, दूध केंद्र, टोल यासारख्या महत्वाच्या ठिकाणी जुन्या नोटा 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत स्वीकारण्यात येणार होत्या. पाचशे आणि हजारच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे उडालेला गोंधळ तसंच बॅंका आणि एटीएमबाहेर लोकांची गर्दी पाहून 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा सरकारी रुग्णालये, पेट्रोल पंप, दूध केंद्र, टोल यासारख्या महत्वाच्या ठिकाणी 24 नोव्हेंबरपर्यंत स्वीकारल्या जातील, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे नागरीकांना मोठा दिलासा मिळणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close