राष्ट्रीय महामार्गांवर 18 नोव्हेंबरपर्यंत टोलमाफी

November 14, 2016 4:47 PM0 commentsViews:

mumbai vashi toll14 नोव्हेंबर : राष्ट्रीय महामार्गांवर आता 18 नोव्हेंबरपर्यंत टोलमाफी देण्यात आलीय, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी जाहीर केलंय. राज्याच्या अधिकारातल्या टोलबद्दल मात्र निर्णय झालेला नाही. त्याबद्दल लवकरच भूमिका स्पष्ट करू, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

नोटबंदीच्या निर्णयानंतर देशात चलनाचा तुटवडा जाणवतोय. त्यानंतर टोलनाक्यांवर टोल घेतला जात नाहीये. आज 14 तारखेपर्यंत टोलमाफी देण्यात आली होती. त्याची मर्यादा आता वाढवण्यात आली असून आता 18 नोव्हेंबरपर्यंत ही मुदत वाढवण्यात आलीय. त्यामुळे वाहनचालकांना टोलमधून काही दिवस तरी मुक्ती मिळालीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close