…म्हणून एटीएम मशीन बंद !

November 14, 2016 6:38 PM0 commentsViews:

atm_close14 नोव्हेंबर : बँकेमध्ये रांगा, बँकेबाहेरही रांगा आणि एटीएमबाहेर रांगाच..अशी परिस्थिती सध्या सगळीकडे आहे. त्यातच देशभरातली एटीएम सेंटर्स बंदच आहेत. एटीएम सेंटरमध्ये नोटा मिळण्यासाठी अजून काही वेळ लागणार आहे. ही एटीएम सेंटर्स कधी सुरू होणार हा प्रश्न सगळ्यांना सतावतोय. एटीएम सेंटर्स पुन्हा सुरू करण्यासाठी काही तांत्रिक गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे.

एटीएम सेंटर्स बंद का ?

- देशभरात सुमारे 2 लाख एटीएम सेंटर्स
- एटीएम सेंटर्समध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा शिल्लक
- एटीएम सेंटर्समधून या नोटा काढून नव्या नोटा भरणं आवश्यक
- एटीएम सेंटर्समध्ये सध्या 100, 500 आणि 1000 च्या नोटा ठेवण्याची सोय
- प्रत्येक एटीएम सेंटरमध्ये नोटांचे 4 प्रकारचे रोल
- यापैकी 2 रोल 100 रुपयांच्या नोटांसाठी
- तिसरा रोल 500 रुपयांच्या नोटांसाठी
- चौथा रोल 1000 रुपयांच्या नोटांसाठी
- या रोलमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बसवण्यासाठी वेगळा रोल लावणं आवश्यक
- 500 आणि 1000 च्या नोटांऐवजी 50 आणि 100 रुपयांच्या नोटा भरण्याचीही गरज
- एटीएम सेंटरमध्ये नोटा भरण्याआधी या सेंटर्सची तपासणी होणं आवश्यक
- या प्रक्रियेमुळे एटीएम सेंटर्स सुरू व्हायला लागणार वेळ


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close