ज्याची करावी कीव तोच घेतो जीव, वळूने शेतकऱ्याला पाण्यात बुडवलं

November 14, 2016 7:23 PM0 commentsViews:

14 नोव्हेंबर : शेतकऱ्यांचे आपल्या जनावरांप्रती एक वेगळेच प्रेम असते याचे अनेक उदाहरणही आहेत. पण याचा उलटा प्रत्यय आज परभणीत पाहण्यास मिळाला.  जोगवाडा गावात  पाण्यात बुडत असलेल्या वळूला वाचवण्यासाठी शेतकरी धावला मात्र त्या वळूनेच शेतकऱ्याला खुंदळुन पाण्यात बुडवले. त्यात शेतकऱ्याचा दुदैर्वी मृत्यू झालाय.

valu4342परभणीच्या जिंतूर तालुक्यातील जोगवाडा गावातील तलावात माणिक म्हस्के या शेतकऱ्याला आज सकाळी वळू पडलेला दिसला लगेच म्हस्के यांनी त्या वळूला वाचवण्यासाठी टायर घेऊन पाण्यात उडी घेतली. मात्र वळूच्या जवळ जाताच त्या वळूने म्हस्के यांना पाण्यातच खुंदळले. यामध्ये माणिक म्हस्के यांचा मृत्यू झाला. परंतु, त्यांचा मृतदेह अद्याप सापडला नाही. यामुळे परिसरातील शेतकरी,नागरिकांनी याठिकाणी मोठी गर्दी केलीय तर चारठाणा पोलीस आणि स्थानिक भोई मिळून मृतदेह शोधण्याचं काम करताहेत. वळू या कामात अडथळा आणत असल्याने मागच्या 10 तासापासून अडकलेला वळू स्थानिक भोयांनी मोठ्या पराकाष्ठेने बाहेर काढलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close