56 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर जॅकी चॅनची ऑस्कर भरारी

November 14, 2016 8:16 PM0 commentsViews:

14 नोव्हेंबर : आपल्या अभिनयासह धडाकेबाज फायटिंग आणि विनोदाने चाहत्यांची मनं जिंकणा-या जॅकी चॅनचा आता ख-या अर्थाने सन्मान झालाय. फिल्म इंडस्ट्रीत जवळपास 56 वर्षांत 200हुन अधिक चित्रपटात काम केल्यानंतर वयाच्या 66 व्या वर्षी पहिल्यांदा त्यांना ऑस्करने सन्मानित करण्यात आले आहे.

Actor Jackie Chan reacts as he accepts his Honorary Award as actor Chris Tucker (C) looks on at the 8th Annual Governors Awards in Los Angeles, California, U.S., November 12, 2016.   REUTERS/Mario Anzuoni
  जॅकी चॅन यांनी पाच दशके आपल्या विनोदाने, मार्शल आर्ट आणि अद्वितीय स्टंट्सनी मोठा चाहतावर्ग मिळवला आहे.असे खतरनाक स्टंट्स करताना अनेकदा त्यांना जखमीही व्हावे लागले आहे. मात्र, इतक्या सुपरहीट फिल्मस्‌नंतरही त्यांना कधीही ऑस्कर मिळवता आला नव्हता. त्यांची ती इच्छाही आता पूर्ण झाली आहे. लॉस एंजिलस येथे सिल्वेस्टर स्टॅलन यांच्या हस्ते आठव्या ऍन्युअल गव्हर्नर्स ऍवॉर्डमध्ये त्यांना ही गोल्डन ट्रॅाफी देण्यात आली.

हा पुरस्कार स्विकारताना त्यांनी कबुल केले की,त्यांचे आई-वडील त्यांच्याकडे नेहमीच ऑस्करची विचारणा करीत असत. त्यांनी त्यांच्या जगभरातल्या चाहत्यांचे आभार मानले आणि त्यांच्यामुळेच ते असल्याचं म्हटलं. आपण यापुढेसुद्धा चांगले काम करू,अशी सर्वांना शाश्वती दिली. आपल्या मायदेशाचा-चीनचा आपल्याला आदर असल्याचे आणि हॉलिवूडने आपल्याला खूप लहान लहान गोष्टी शिकल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close