विमानतळांवर 21 नोव्हेंबरपर्यंत पार्किंग फ्री

November 14, 2016 8:46 PM0 commentsViews:

airport_parking414 नोव्हेंबर :  नोटाबंदीमुळे विमानतळांवरचं पार्किंग शुल्क माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. देशातल्या सगळ्या विमानतळांवर 21 नोव्हेंबरपर्यंत पार्किंग शुल्क माफ असणार आहे अशी घोषणा केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी ट्विटरवरून केली.

500 आणि 1000 नोटा रद्द करण्यात आल्यानंतर सुट्टा पैशांचा तुटवडा झालाय. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर 18 नोव्हेंबरपर्यंत टोलमाफी जाहीर करण्यात आलीय. त्यासोबतच आता विमानतळावरचं पाकिर्ंग शुल्कही माफ करण्यात आल्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळालाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close