उदयनराजेंचे सुपूत्र वीरप्रतापराजेंची एव्हरेस्ट ‘स्वारी’ !

November 14, 2016 9:16 PM0 commentsViews:

udayanraje bhosale son veerpratap raje (4) 14 नोव्हेंबर : खासदार उदयनराजे यांचे पूत्र वीरप्रतापराजे यांनी अवघ्या अकराव्या वर्षी एव्हरेस्टच्या बेसकँम्पपर्यंत मजल मारलीये. वीरप्रताप अवघ्या अकरा वर्षांचे आहेत. दमयंतीराजे भोसलेंच्या मार्गदर्शनाखाली वीरप्रताप यांनी ही कामगिरी केली.

वीरप्रतापराजे यांनी आपल्या आईच्या मदतीने जगातील सर्वात उंच शिखर पर्वत असलेल्या एव्हरेस्ट पर्वताच्या बेस कॅम्पपर्यंत जाण्याचा विक्रम करून दाखवला आहे. दमयंतीराजे भोसले यांच्या साथीने एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत अवघ्या 11 वर्षांत धडक मारून एक वेगळाच संदेश दिला आहे. 26 ऑक्टोबरला नेपाळ काठमांडू येथील कुंभूव्हॅली येथून या कॅम्प ची सुरुवात झाली. 9 दिवसांच्या या कॅम्प मध्ये अनेक अडचणी आल्या मात्र दमयंतीराजे आणि वीरप्रतापराजे यांनी हा कॅम्प पूर्ण केला आहे. या प्रवासा दरम्यान गोरकशिप येथे सर्वात उंचीवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्याचे दर्शन घेतलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close