मायावती यांची पुन्हा एकदा काँग्रेसवर टीका

October 18, 2008 1:49 PM0 commentsViews: 5

दिनांक 18 ऑक्टोबर, लखनौ – उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसनं नेहमीचं दलित,मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांकांना सापत्न भावाची वागणूक दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. लखनौमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. देशात या वर्गाला अजूनही न्याय मिळालेला नाही.यासाठी काँग्रेसचं जबाबदार असल्याचं त्या म्हणाल्या. उत्तरप्रदेशमध्ये आम्ही काँग्रेसला धडा शिकवला आहेच.आता देशपातळीवर काँग्रेसला धडा शिकवण्याची गरज असल्याचं त्या म्हणाल्या.

close