जिल्हा आणि अर्बन बँकांना नोटा स्वीकारायला बंदी

November 14, 2016 10:27 PM1 commentViews:

RBI benner14 नोव्हेंबर : जिल्हा बँका आणि अर्बन बँकांनी जुन्या नोटा स्वीकारू नये, असा सक्त आदेश रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा काढलाय. या बँकांमध्ये काळ्या पैशाचे व्यवहार होण्याचा संशय असल्यामुळे रिझर्व्ह बँकेने हा आदेश काढलाय. नोटाबंदीच्या निर्णयानंतर जिल्हा आणि अर्बन बँकांचे खातेदार आपापल्या बँकेत बँकांचे व्यवहार करण्यासाठी जातायत पण त्यांच्या नोटा स्वीकारल्या जात नाहीयेत आणि बदलूनही मिळत नाहीयेत.

आपल्या नोटा बदलण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जावं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा निर्णय जाहीर करतानाच म्हटलं होतं. पण जिल्हा आणि अर्बन बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्याची परवानगी द्यावी,अशी मागणी आमदार प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. यावर अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी मी चर्चा करेन, असं आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Vasundhara Limaye

    छोट्या नोटांची टंचाई झाली तर ???