पंतप्रधानांच्या आई बँकेत, रांगेत राहुन पैसे बदलले

November 15, 2016 1:46 PM0 commentsViews:

15 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आई हिराबेन मोदी ह्या दस्तुरखुद्द बँकेत गेल्या आणि स्वत: जवळच्या जुन्या पाचशे रूपयांच्या नोटा बदलून नव्या नोटा घेतल्या. 97 वर्षांच्या हिराबेन मोदी यांनी बँकेत जाऊन रांगेत उभं राहुन पैसे काढले.

8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 च्या नोटा बंद चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर दुस-या दिवसापासून आपल्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकामध्ये लोकांनी एकच गर्दी केलीये ती आजही कायम आहे.

बँकेत तासंतास रांगते उभं राहुन लोक पैसे बदलून आणि जमाही करत आहे. रांगेत उभं राहण्याबाबत देशभरात ‘चर्चासत्र’ रंगले आहे. तर दुसरीकडे खुद्द पंतप्रधानांची आई वयाच्या 97 व्या वर्षी बँकेत जाऊन, रांगेत उभ्या राहून पैसे बदलून घेतले.

गांधीनगरमधील ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सच्या शाखेत जाऊन त्यांनी साडेचार हजार रुपये जमा केले. त्यांच्याकडे 500 च्या 9 जुन्या नोटा होत्या. ही रक्कम जमा केल्याच्या मोबदल्यात त्यांना 2000 ची एक नोट आणि 10-10 चे दोन बंडल आणि 100च्या पाच नोटा मिळाल्यात. लोकांना जो सध्या त्रास होतोय तो सहन करण्याच्या तयारी सर्वानिंच दाखवावी असा संदेश यातून देण्याचा प्रयत्न केला जातोय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close