अर्ज भरा, शुल्कनंतर द्या ; दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

November 15, 2016 3:09 PM0 commentsViews:

10th exam315 नोव्हेंबर : दहावी आणि बारावीच्या सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांना राज्य सरकारने दिलासा दिलाय. परिक्षांचे अर्ज भरताना नोटांची अडचण येत असल्यामुळे आता या विद्यार्थ्यांनी परिक्षेचा अर्ज आधी भरावा आणि शुल्क नंतर भरावे असा निर्णय राज्य सरकारने घेतलाय.

तरीही ज्या विद्यार्थ्यांचे शुल्क भरण्याचे शिल्लक असल्यास अशा विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परिक्षेला बसणा-या कोणत्याही विद्यार्थ्यांना नोटांच्या अडचणीमुळे परिक्षेला बसता येणार नाही असं होणार आहे असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलंय.

दहावी आणि बारावीच्या परिक्षेला बसणा-या विद्यार्थ्यांना जुन्या नोटांमुळे प्रवेश शुल्क भरताना अनेक अडचणी येत आहे. याबाबतच्या काही तक्रारी शिक्षक, पालक, विद्याथच् संघटनांनी केल्या होत्या.त्यामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी आता पहिले फॉर्म भरावा आणि नंतर शुल्क भरावे, त्यासाठी या विद्यार्थ्यांना फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तसंच त्यांच्या पालकांना चिंता करण्याचे काहीही कारण नाही असंही तावडे यांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close