कसाबला फाशी द्या

May 4, 2010 11:09 AM0 commentsViews: 2

4 मेमुंबईवर हल्ला करून निरपराधांचा बळी घेणार्‍या अजमल कसाबला फाशीचीच शिक्षा द्या, अशी मागणी सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी केली आहे.

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दोषींच्या शिक्षेप्रकरणी आज स्पेशल कोर्टात युक्तीवाद होत आहे.

कोर्टाने हल्ल्याप्रकरणी कसाबला दोषी ठरवले आहे. या खटल्यातील सहआरोपी फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन यांची मात्र कोर्टाने पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे.

त्यांच्या सुटकेविरोधात मुंबई क्राईम ब्रँच हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे.

close