नोटबंदीमुळे पुणे मॅरेथॉन पुढे ढकलली

November 15, 2016 5:12 PM0 commentsViews:

pune marathon15 नोव्हेंबर : सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे पुणे मॅरेथॉन पुढे ढकलावी लागलीय. पुण्यामध्ये 4 डिसेंबरला ही आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन होणार होती. देशातली आथिर्क स्थिती आणि बँकांवर असलेले निर्बंध यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय, असं या मॅरेथॉन स्पर्धेच्या संयोजकांनी म्हटलंय. संयोजन समितीच्या बैठकीत मॅरेथॉन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुणे मॅरेथॉनसाठी 5 हजार खेळाडूंची नोंदणी झालीय. यापैकी106 खेळाडू परदेशी आहेत.या खेळाडूंची गैरसोय होईल, असं या संयोजकांचं म्हणणं आहे. स्पर्धेची पूर्ण व्यवस्था झाली असली तरी नोटांच्या समस्येमुळेच ही मॅरेथॉन रद्द करावी लागली. आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन असोसिएशनकडून जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये नवीन तारीख आल्यानंतरच याबद्दलचा निर्णय जाहीर करू, असं संयोजकांनी म्हटलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close