नोटाबंदीविरोधात ममतादीदींसोबत शिवसेना रस्त्यावर उतरणार!

November 15, 2016 7:12 PM1 commentViews:

mamatadidi_sena15 नोव्हेंबर : नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेनं पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसशी एकत्र लढण्याचा निर्णय घेतलाय. ममता बॅनर्जी यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर चर्चा केली असून आम्ही शिवसेनेसोबत असल्याचं बॅनर्जी यांनी सांगितलंय.

उद्यापासून दिल्लीत सुरू होणा-या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेही आपली मोर्चेबांधणी सुरू केलीय. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर शिवसेनेच्या खासदारांची बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी, मोदींना पवार चालत असेल तर आपल्याला ममता बॅनर्जी का चालणार नाही असा सवाल उपस्थित करत एकत्र रस्त्यावर उतरण्याचे संकेत दिले.

त्यानंतर घडामोडींना वेग आला. दस्तरखुद्द ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला. दोन्ही नेत्यांची फोनवर चर्चा झालीय आणि एकत्र लढण्यावर एकमत झालंय.

उद्या दिल्लीत तृणमूल काँग्रेस मोर्चा काढणार आहे. या मोर्च्याच्या निमित्ताने देशभरातील सर्वच विरोधपक्षांना तृणमूलकडून निमंत्रण देण्यात आलंयय  राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन नोटाबंदीला विरोध दर्शवणार आहे. यावेळी शिवसेना तृणमूल काँग्रेससोबत असणार आहे. विशेष म्हणजे डाव्या पक्षासह इतर पक्षांनी सहभाग होण्याबाबत निर्णय कळवलेला नाही. पण सेनेनं सहभागी होणार असल्याचं निश्चित केलंय. आता सेनेनं ममतादीदींसोबत एकत्र रस्त्यावर उतरल्यामुळे युतीवर काय परिणाम होईल हे पाहण्याचं ठरणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • PMDEO1965

    So Mamata has no problem now joining hands with the communal forces…….. How long are the Politicians going to think they can fool the citizens ?

close