पेट्रोल 1.46 तर डिझेल 1.53 पैशांनी स्वस्त

November 15, 2016 10:02 PM0 commentsViews:

petrol_3415 नोव्हेंबर : नोटाबंदीमुळे हैराण झालेल्या सर्वसामान्यांच्या जखमेवर पेट्रोलियम कंपन्यांनी फुंकर मारलीये. पेट्रोल 1 रुपया 46 पैसे तर डिझेल 1 रुपया 53 पैशांनी स्वस्त झालंय. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहे.

सलग पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे हैराण झालेल्या वाहनधारकांना अखेरीस दिलासा मिळालाय. मागील महिन्यात पेट्रोलच्या दरात 1.34 आणि डिझेल 2.37 रुपयांची दरवाढ करण्यात आली होती तर ऑक्टोबरमध्ये दोनदा दरवाढ केली होती. या दरवाढीनंतर अखेर थोडी का होईन दरकपात करण्यात आलीये. पेट्रोल प्रतिलिटर 1 रुपया 46 पैसे आणि डिझेल 1 रुपया 53 पैशांनी स्वस्त झाले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close