बोअरमध्ये पडलेल्या मुलाला वाचवण्यात अपयश

May 4, 2010 2:10 PM0 commentsViews: 2

4 मे

बोअरमध्ये पडलेल्या दोन वर्षांच्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नांना अपयश आल्याची घटना बीडमध्ये घडली.

17 तास अथक प्रयत्न करूनही संतोष नागू म्हस्के नावाच्या या मुलाचा अखेर मृतदेहच हाती लागला.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अंतरवाळी शिवारामध्ये हा प्रकार घडला. सोमवारी दुपारी 2 वाजता संतोष खेळताना उघड्या बोअरमध्ये पडला.

त्यानंतर जिल्हा प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम केले. ऑक्सिजनचा पाईपही बोअरच्या पाईपमध्ये सोडण्यात आला होता. संतोषला बाहेर काढण्याचे रात्रभर प्रयत्न करण्यात आले. पण अखेर ते अयशस्वी ठरले.

मूळ तलवाडा येथील राहणारे नागू म्हस्के हे विहीरीचे काम करण्यासाठी कुटुंबासह अंतरवाळी येथे आले होते. विहिरीच्या कामाच्या पहिल्याच दिवशी हा प्रकार घडला.

close