मोदी गरीबांचा पैसा उद्योगपतींना देणार – राहुल गांधी

November 16, 2016 1:15 PM0 commentsViews:

Rahul gandhi banner234

16 नोव्हेंबर :   बँकेच्या रांगेत उद्योगपती दिसतात का, गरीबांचा पैसा उद्योगपतींच्या खिशात जाणार आहेत, असे म्हणत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भिवंडी कोर्टात दाखल केलेल्या मानहानी खटल्याच्या सुनावणीसाठी राहुल गांधी कालच दिल्लीतून मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर आज सकाळी ते भिवंडीत पोहोचले आणि कोर्टात हजर झाले. यावेळी कोर्टाबाहेर मोठ्या प्रमाणात काँग्रेस समर्थकांनी गर्दी केली होती. जामीन मंजूर झाल्यानंतर राहुल यांनी कोर्टाबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांसमोर भाषण केलं. मी गांधीजींच्या विचारांसाठी ही लढाई लढत आहे, असं नमूद करत राहुल यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले.

 यावेळी राहुल यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. बँकाबाहेर ज्या रांगा लागत आहेत त्या गरीब, सर्वसामान्य लोकांच्या रांगा आहेत. या रांगांमध्ये एकही उद्योजक दिसत नाही, असं नमूद करत गरिबांचा पैसा नरेंद्र मोदी मोजक्या 15-20 उद्योजकांना देणार आहेत, असा आरोप राहुल यांनी केला.

या सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसने जी लढाई सुरू केली आहे ती सुरूच राहणार आहे. कार्यकर्त्यांनी आता एक इंचही मागे जायचे नाही, असं आवाहन राहुल यांनी केलं. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी देश झुकणार नाही. देशाला कुणीही झुकवू शकत नाही, असा इशाराच राहुल यांनी यावेळी दिला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थित होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close