मोदी सरकारनं सर्वसामान्यांना भिकारी बनवून टाकलं – आनंद शर्मा

November 16, 2016 2:51 PM0 commentsViews:

hlsahgy

16 नोव्हेंबर : पाचशे आणि एक हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेससह सर्व पक्षांच्या विरोधकांनी आज जोरदार हल्लाबोल केला. ‘स्वत:चे पैसे बँकेतून काढण्यासाठी लोकांना भीक मागावी लागत आहे. मोदी सरकारनं सर्वसामान्यांना भिकारी बनवून टाकलं आहे,’ अशी तोफ काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी डागली.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नोटाबंदीच्या निर्णयावरुन काँग्रेसने सरकारला चांगलेच धारेवर धरले. गरिबांच्या पैशांवर सर्जिकल स्ट्राइक का, तसेच सरकारने जनतेच्या पैशांवर बंदी घालण्याचा अधिकार कोणत्या संविधानानुसार घेतला असा सवाल करत केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे देशात अराजकता निर्माण झाली असून शेतकरी आणि मजुरांना याचा सर्वाधिक फटका बसला असल्याचे शर्मा म्हणाले.

‘भारतीय अर्थव्यवस्थेत 86 टक्के पैसा हा पाचशे आणि एक हजारच्या नोटेच्या स्वरूपात होता. सरकारच्या एका निर्णयानं तो सगळा रद्दीत निघाला आहे. हा सगळा पैसा काळा होता का,’ असा सवाल शर्मा यांनी केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close