सोशलकल्लोळ : सोनम गुप्ता कोण हैं ?

November 16, 2016 4:15 PM0 commentsViews:

16 नोव्हेंबर : प्रेमकरणारे आणि प्रेमभंग झालेले काय करतील याचा नेम नाही. भिंतीवर, झाडावर, एवढंच काय तर बस असो की लोकल कुठेही आपल्या प्रेमाचा खुलमखुल्ला प्रदर्शन मांडताय. अशाच एका प्रेमभंग झालेल्या मजनूची दखल अवघ्या सोशल मीडियाने घेतलीये.

या पठ्‌ठ्याने ‘सोनम गुप्ता बेवफा है’ असं 10 च्या नोटंवर लिहिलं. आणि भरात भर म्हणजे नव्याने आलेल्या 2000 च्या नोटेवरही ‘सोनम गुप्त बेवफा है’ लिहून कहरच केला. सोमवारपासून सोशल मीडियावर “सोनम गुप्ता बेवफा हैं” हा टॉप ट्रेंड चर्चेत आहे.

“सोनम गुप्ता बेवफा हैं” असं लिहलेली, 10 रुपयाची नोट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालीये. एका दु:खी प्रियकराने त्याला दगा देणा-या प्रेयसीला बदनाम करण्यासाठी हे कृत्य केले आहे. परंतु याचा फटका इतर सोनम गुप्ता नावांच्या मुलींना बसलाय. बंर, भारतीय नोटेपुरता हा विषय राहिला नाही. तर इंग्लंड आणि अमेरिकेच्या नोटेवरही ‘सोनम गुप्ता बेवफा है’ लिहून आपले दु:ख आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close