…तर यापेक्षा मोठे आंदोलन

May 4, 2010 2:50 PM0 commentsViews: 1

4 मे

यावेळीही मोटरमेननी चर्चेत माघार घेतली आहे. पण 15 जून पर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर यापेक्षा मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मोटरमन असोसिएशनचे सचिव जयंत निमसोडकर यांनी दिला आहे.

…तर कारवाई करा

संपकरी मोटरमननी कामावर तातडीने रूजू व्हावे. नाही तर त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. न्यायमूर्ती जे. एन. पटेल आणि न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले.

कामावर जाणार्‍या मोटरमनवर दबाव आणला जात असेल तर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्या. तसेच धमकी देणार्‍या मोटरमेन्सवर कारवाई करा, असा आदेशही कोर्टाने दिले आहेत.

मोटरमननी पुकारलेल्या संपाच्या विरोधात रेल्वे प्रशासनाने हायकोर्टात धाव घेतली आहे. याबाबतच्या सुनावणीच्या वेळी कोर्टाने हे आदेश दिले आहेत.

आता पुढची सुनावणी उद्या सकाळी 11 वाजता होईल. संप बेकायदेशीर जाहीर करण्यात यावा ही याचिकेतील मुख्य मागणी आहे.

close