शिवसेनेची गांधीगिरी, रांगेत उभ्या ग्राहकांना ‘झेंडू बाम’ वाटप

November 16, 2016 7:34 PM0 commentsViews:

solpur_sena16 नोव्हेंबर: नोटाबंदीचा विरोध करण्यासाठी शिवसेनेनं गांधीगिरी सुरू केलीये. सोलापूरमध्ये नोटांसाठी रांगेत थांबलेल्या खातेदारांना शिवसैनिकांनी चक्क झेंडू बाम वाटले. नरेंद्र मोदी यांनी 500 आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर देशभरातून जनतेने मोदी सरकारचे अभिनंदन केले. मात्र सोलापुरातील बँकांसमोर नोटा बदलण्यासाठी तासनतास उभे असलेल्या नागरिकांना होणारा त्रास पाहून शिवसेनेने झंडुबामचे वाटप करुन मोदीगिरीला गांधीगिरीने उत्तर दिलंय.

मोदींच्या निर्णयाचे चारपाच दिवसांतच जनतेने नियोजनाबाबत मात्र नाराजी व्यक्त केलीय. कारण तासंतास रांगेत थांबून खातेदारांचे मात्र कंबरडे मोडलंय. त्यामुळे शिवसेना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरली. जनतेचे हाल होत आहेत, सर्वच बँकांसमोर नोटा बदलून घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी पडत असून लांबच लांब रांगा दिसून येत आहेत.

दरम्यान, सोलापुरातील बँकांसमोर नोटा बदलण्यासाठी तासंतास रांगेत उभे राहून नागरिकांचे हात, पाय आणि कंबर दुखत आहेत. यामुळेच त्यावर इलाज म्हणून शिवसेने आता बाणाऐवजी ‘झंडूबाम’चा प्रहार केलाय. एकंदरितच काय तर भाजपच्या नोटा रद्दच्या निर्णयाची खिल्ली सेनेने उडविली आहे. सेनेचा हा झंडुबाम उतारा भाजपाला चांगलाच झोंबण्याची शक्यता आहे. भाजपने तुर्तास यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close